सांगली : ठाणे पोलीस मुख्यालयाकडील पोलीस भरती प्रक्रियेत सांगली पोलीस दलातील एक पोलीस शिपाई संशयास्पद स्थितीत आढळून आला. सहकारी मित्राला पोलीस भरती करण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. याबाबत ठाणे पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याची माहिती दिली आहे.ठाणे पोलीस मुख्यालयात सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. सांगली पोलीस दलातील साळुंखे नावाचा कर्मचारी मित्रासोबत या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्याने देखील दुसºयांदा अर्ज केला होता. दोघांनी संगनमत करुन शारीरिक चाचणीत चांगले गुण मिळवण्यासाठी मिळालेल्या चेस्ट क्रमांकाची अदलाबदल करण्याची योजना आखत मैदानावर प्रवेश केला. त्याचवेळी चाचणीसाठी आलेल्या एकाने साळुंखे याला ओळखले. तो तीन वर्षापूर्वीच सांगली पोलीस दलात भरती झाला होता. साळुंखेबाबत ठाणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणे पोलिसांनी साळुंखेला मैदानाच्या बाहेर काढत सांगली पोलिसांना माहिती दिली.पोलिसांकडे लक्षसांगली पोलीस दलातील एका पोलिसाने ठाणे येथील पोलीस भरतीमध्ये तोतयागिरी केल्याचा आरोप आहे. तसा अहवाल सांगली पोलिसांकडे दिला असून ते ‘त्या’ पोलिसावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.